Daily Mahasatta

Daily Mahasatta

विकासकामात अडथळा आणल्याचा आरोप बिनबुडाचा : विक्रम पाटील


इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
शहराच्या विकासकामांमध्ये विकास आघाडी अडथळा आणत असल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. आरोप हे केवळ येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जनतेची दिशाभूल करणारे आहेत. असले बिनबुडाचे आरोप करणे त्यांनी बंद करावेत, विषयपत्रिकेवर असलेल्या ८२ विषयांपैकी ६५ विषय त्यांनीच सुचविलेले आहेत व बाकीचे १७ विषय हे शहरातील नागरिक व अन्य नगरसेवकांचे आहेत मग ही विषयपत्रिका बेकायदेशीर कशी ? असा सवाल करत विकास आघाडीचे अध्यक्ष, पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी राष्ट्रवादीचा खरपूस समाचार यांनी पत्रकार परिषदेत घेतला.

श्री पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सत्तेच्या माध्यमातून शहरातील जनतेची पिळवणूक केली, त्यांच्याच सत्तेत अंबिका शॉपिंग सेंटर, आरक्षणाच्या जागेत गाळे, छ. शिवाजी महाराज भाजी मंडईतील ४० टक्के बेकायदेशीर बांधकाम केले. मग चुकीचा कारभार कोण करत आहे ते त्यांनीच सांगावे. विकास आघाडी व शिवसेना ही स्व. अशोकदादा पाटील व अशोकदादा पवार यांच्या विचाराने शहर प्रगतीपथावर नेण्याचे काम आम्ही करत आहोत. विकास विकास आघाडीतील कोणताही नगरसेवक विकासाच्या आड येणार नाही. ज्यांनी असे आरोप केले आहेत त्यांनी गेल्या ३० वर्षाच्या सत्तेच्या काळात विकास करताना कोणी हात धरले होते काय ? आपले व्यवसाय, उद्योग वाढवण्यासाठी नगरसेवक पद मिळवून संपत्ती मिळवायचे उद्योग कोण करतय हेही त्यांनी जाहीर करावे. नगरपालिकेच्या निवडणूक येईपर्यंत भुयारी गटारीची ९० % आम्ही पूर्ण करणार आहोत.

भुयारी गटारीच्या कामात मुरूम नेऊन खिसे कुणी भरले ते त्यांनी पुरावा देऊन जाहीर करावे त्यांच्यावर कारवाई करू. भुयारी गटर एसटीपी साठी लागणारी लागणारी जागा भूसंपादन करून त्याची ७/१२ ला नोंदही झाली आहे, यावरून त्यांचे नगरपालिकेत किती लक्ष आहे ते दिसून येते. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात ही योजना त्यांना का आणता आली नाही ? राज्यात सत्ता येताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळत लगेच ही योजना मंजूर करून दिली. आगामी निवडणुकीपर्यंत शहरातील 90 टक्के रस्ते आणि गटारींची कामे पूर्ण करू. जनता आमच्या कामावर समाधानी आहे. उद्या जरी निवडणूक लागली तरी त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. यावेळी पूर्ण बहुमत मिळवून सत्तेत येऊ." यावेळी निवास पाटील, गणेश परीट, समीर आगा उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments