Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात मुख्याधिकारी आणि कोरोनाग्रस्तांची 'ग्रेट भेट'

विटा (प्रतिनिधी) : मुख्याधिकारी अतुल पाटील हे प्रशासनावरील वचक आणि धाडसी कारवाई यासाठी ओळखले जातात. आता त्यांच्या व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू समोर आला आहे. त्यानी आज दिवसभरात शहरातील होम आयसोलेशन मध्ये असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांना आधार दिला. विटा पालिका संकटाच्या काळात आपल्या पाठीशी आहे. तुम्ही घरा बाहेर पडू नका, तुमची अडचण आम्हाला कळवा. आम्ही ती तातडीने सोडवू असे सांगत रुग्णांना आधार दिला. त्यांच्या या ग्रेट भेटीचे कौतुक होत आहे.

याबाबत मुख्याधिकारी अतुल पाटील म्हणाले, गेल्या पंधरा दिवसात विट्यामध्ये कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. शहरामध्ये विविध माध्यमातून जनजागृती सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हाणून नगरपरिषदेची सर्व टीम विटा शहरामध्येम फिरून होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रूग्णांची विचारपूस करत आहे, त्यांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले. त्यांना स्वतःची व परिवाराची काळजी घेण्यास सांगितले. काही अडचण आल्यास नगरपरिषदेस कळवावे व त्या
बाबत सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जे लोक होम क्वारंटाईन असून घरातून बाहेर फिरतात त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्याेत आले आहेत.

मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी होम आयसोलेशन मध्ये असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची थेट घरी जाऊन भेट घेतल्याने व त्यांना आधार दिल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

यावेळी विटा नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक बाजीराव जाधव, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, सहायक नगररचनाकार अनिकेत महाजन, अतिक्रमण विभाग प्रमुख नारायण शितोळे, सर्व वॉर्ड ऑफिसर , वॉर्ड सहायक व नगरपरिषदेची सर्व टीम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments