Daily Mahasatta

Daily Mahasatta

सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करा : पृथ्वीराज पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगली, (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे सलून व्यावसायिकांची दुकाने बंद ठेवण्यात आल्यामुळे त्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात सलून व्यावसायिकांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे, कोरोना काळासाठी काही घटकांना सरकारने मदत जाहीर केली आहे, त्याच पद्धतीने सलून व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज दिले, तर खूप मोठा आधार मिळणार आहे.

सलून व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंबीय यांचे  सरसकट लसीकरणही लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments