Daily Mahasatta

Daily Mahasatta

'श्रेयस' पतसंस्थेची कोरोनाच्या भीषण काळात देखील उत्तुंग भरारी

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील सुमारे ९-१० महिने लॉकडाऊनची परिस्थिती असताना देखील सुयोग्य व्यवस्थापनातून श्रेयस नागरी पतसंस्थेने सुमारे ७० लाखांचा नफा मिळवला आहे.

विटा (प्रतिनिधी) : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील सुमारे ९-१० महिने लॉकडाऊनची परिस्थिती होती. तरीही सुयोग्य व्यवस्थापन, काटकसर व सर्व संचालक कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्नामुळे संस्थेने प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेने ७० लाख नफा मिळविला आहे, अशी माहिती श्रेयस नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अॅड. संदीप (दादा) मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू समजून काम करीत असते. कमीत कमी वेळेत चांगल्या सुविधा देताना बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या नवीन बदलांचा स्वीकार करून कार्यरत आहे. यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटातही गतवर्षी संस्थेच्या ठेवीत ३ कोटी २५ लाख वाढ होऊन ३८ कोटी इतक्या झालेल्या आहेत. संस्थेची गुंतवणूक १३ कोटी ४० लाख असून संस्थेने रु. २९ कोटी ३० लाख इतके कर्ज वाटप केलेले आहे. संस्था ९ शाखांच्या माध्यमातून कार्यरत असून सर्व शाखा नफ्यात आहेत तसेच संस्था सभासदांना तत्काळ बँकिंगव्दारे सुविधा देत आहे 

अॅड. मुळीक म्हणाले, श्रेयस नागरी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत गतवर्षी रेवणगाव गाव तलाव खोलीकरण यासाठी मदत केली आहे. तसेच कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख रुपयांची मदत केली आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी देखील एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे. तसेच लॉकडाऊन काळात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन काळात पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना अल्पोपाहार, पाणी इत्यादीचे वाटप करून कोरोना संकटाशी लढ्यात सक्रिय सहभाग घेतला, अशी माहिती अॅड. संदीप मुळीक यांनी दिली आहे.

संस्थेचे प्रगतीसाठी संस्थापक अॅड. बाबासाहेब मुळीक, व्हा. चेअरमन ऍड. बबनराव कदम, श्री. हणमंतराव चोथे, ऍड. प्रमोद देशमुख, श्री. अमित म्हेत्रे, श्री. निवास घोडके, श्री. बापूराव माने, श्री. जयराम गोसावी संचालिका सौ. सरोज पवार, सौ. नंदाताई पाटील तसेच सर्व सेवक, बचत ठेव प्रतिनिधी यांनी योगदान दिले आहे. 

आधिक वाचा :

अनिलभाऊ म्हणाले.. हे तर माझे भाग्यच

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

बाळासाहेब... तुम्ही उद्घाटनाला यावे !

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

दक्षिण भारत जैन सभेचा 123 वा वर्धापन दिन साजरा

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

विकासकामात अडथळा आणल्याचा आरोप बिनबुडाचा : विक्रम पाटील

Post a Comment

0 Comments