Daily Mahasatta

Daily Mahasatta

छप्पर व गंजीस आग लागून पाच जनावरे भाजली, तीन लाखांचे नुकसान

शिराळा (विनायक गायकवाड) : रेठरे धरण ता. वाळवा येथील शेतकरी रामचंद्र सर्जेराव समिंद्रे व कृष्णात सर्जेराव समिंद्रे यांच्या छप्पर व गवताच्या गंजीस भर उन्हात दुपारी अचानक लागलेल्या आगीत ५ जनावरे गंभीर भाजली आहेत. यामध्ये नऊ महिने गाभण असलेल्या गाईसह , म्हैस व रेडीचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीमध्ये जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

रेठरे धरण येथील रामचंद्र सर्जेराव समिंद्रे व कृष्णात सर्जेराव समिंद्रे यांचे डोंगरलगत शेती व जनावरांची वस्ती आहे. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास समिन्द्रे यांच्या छप्पर व गवताच्या गंजीस आग लागल्याचे समजले. गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. येथे समिंद्रे कुटुंबातील सदस्य व काही युवकांनी धाव घेतली. तोपर्यंत वस्तीवरील छप्पर, २ गवताच्या गंज्या, जळण आदी साहित्य जळून गेले होते.

अमर तरुण गणेश मंडळाचे प्रयत्न व्यर्थ
येथील अमर तरुण गणेश मंडळातील युवक व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परिसरात कोणीच नसलेने छपरात अडकलेल्या १ गाय, १ म्हैस, २ रेड्या व १ बैल आगीत गंभीरपणे भाजले. रामचंद्र समिंद्रे यांच्या मालकीची नऊ महिने गाभण असलेली १ गाय या आगीत मृत्युमुखी पडली. जवळपास ३ लाखाचे नुकसान झाले आहे.

मागील वर्षी दोन बैल आगीच्या भक्षस्थानी मागील वर्षी रेठरे धरण येथील समिंद्रे यांचे दोन बैलजोड छप्परात असताना दुपारीच आग लागली होती. त्यात त्यांचे दोन्ही बैलांचा होरपळून मृत्यू झाला होता.
आग लागली का लावली ?
समिंद्रे यांची परिस्थिती गरीबीची आहे. काबाडकष्ट करून आपला चरितार्थ ते चालवतात. त्यांच्या बाबतीत ही दुसरी घटना असल्याने आग लागतेय की लावली जातेय याबाबत शंका उपस्थित होते आहे. लोकप्रतिनिधी यांनी मदत करावी असे आवाहन होत आहे.

Post a Comment

0 Comments