Daily Mahasatta

Daily Mahasatta

आविष्कार ग्रुपच्या सचिवपदी विश्वनाथ पाटसुते, सहसचिव पदी विजय लाड

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : सांस्कृतिक क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आविष्कार कल्चरल ग्रुपच्या सचिवपदी विश्वनाथ मारुती पाटसुते, तर सहसचिवपदी विजय पांडुरंग लाड यांची निवड करण्यात आली. राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली आविष्कार कल्चरल ग्रुपला अधिक गतिमान करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

आविष्कारचे प्रमुख कार्यकर्ते मोहन चव्हाण, सहसचिव प्रा. कृष्णा मंडले यांनी या निवडी जाहीर केल्या. आविष्कारचे संस्थापक सचिव राजेंद्र घोरपडे यांच्या अकाली नात्याने सचिवपद रिक्त झाले होते. आविष्कारचे कार्याध्यक्ष प्रसिध्द कवी प्रा. प्रदीप पाटील म्हणाले, राजेंद्र घोरपडे ,सुधीर पाटील यांच्या अकाली जाण्याने आविष्कारमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. तसेच कोरोनासारख्या संकटांनी आविष्कार चा वेग काहीसा मंदावला आहे. आविष्कार ही केवळ एक संस्था नसून सांस्कृतिक चळवळ आहे. ही चळवळ जोमाने पुढे न्यावी लागेल. नूतन सचिव विश्वनाथ पाटसुते म्हणाले, सर्वांना बरोबर घेवून आविष्कारला गती देवू.

यावेळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डी. बी. पाटील, आविष्कारचे जेष्ठ कार्यकर्ते सचिन पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आविष्कारचे अध्यक्ष सुनील चव्हाण, उपाध्यक्ष भूषण शहा, माजी अध्यक्ष सतीश पाटील, खजिनदार बालाजी पाटील,माजी उपाध्यक्ष राजवर्धन लाड यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी खजिनदार धनंजय भोसले, लव्हाजी देसाई, अजय थोरात यांच्यासह आविष्कारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments