Daily Mahasatta

Daily Mahasatta

कवठेमंहकाळ तालुक्यातील नागरिकांनी नियमांचे पालन करावे : पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे

 

कवठेमहांकाळ (अभिषेक साळुंखे) : शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी केले आहे. 

तहसीलदार बी. जे. गोरे , सहायक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर , शिवाजी करे , नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ . संतोष मोरे यांनी शहरातून फेरी काढत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले . तहसीलदार कार्यालय , म्हसोबा चौक , मुख्य बाजारपेठ , युवावाणी चौक , अग्रण धुळगाव रोड , कुची रोड येथून पोलिसांनी रूट मार्च काढला . सूचनांचे पालन करा , अन्यथा कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला .

Post a Comment

0 Comments