Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वांगी ग्रामपंचायतीस केंद्र सरकारचा पंचायत राज सशक्तिकरण पुरस्कार


कडेगाव (सचिन मोहिते)
वांगी ग्रामपंचायतीस केंद्र सरकार व पंचायती राज मंत्रालय भारत सरकार  यांच्यामार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठित असा "पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार" प्राप्त झाला आहे, अशी माहिती सरपंच डाॅ  विजय होनमाने यांनी दिली आहे.

सरपंच डाॅ होनमाने म्हणाले, या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून १७ ग्रामपंचायतीची तर आपल्या सांगली जिल्ह्यांतून एकमेव  वांगी ग्रामपंचायतीची निवड झालेली आहे. वांगी ग्रामपंचायतीने ई गवर्नेंस, केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधीचे उत्तम व्यवस्थापन  , इन्फॉरमेशन डिसक्लोजर , सामाजिक उत्तरदायित्व, अकाऊंट मेंटेनन्स , प्लॅनिंग  व मीटिंग मॅनेजमेंट या विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पूरस्कार मिळाला आहे.

केंद्र सरकार व पंचायती राज मंत्रालय भारत सरकार  यांच्यामार्फत देण्यात येणारा प्रतिष्ठित असा "पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार" मिळल्याबद्दल वांगी ग्रामपंचायतीचे सरपंच डाॅ. होनमाने यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व  सदस्यासह ग्रामस्थाचे आभार मानले आहे.

 

Post a comment

0 Comments