Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ मध्ये कोरोनाचा शिरकाव, चिंता वाढली

पेठ (रियाज मुल्ला) : पेठ  तालुका वाळवा येथे आज एकूण 3 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह  आले असल्याची  माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली. पेठ मध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागल्याने परिसरातून चिंतेचे वातावरण आहे. 

पेठ गावातील एक  23 वर्षीय पुरुष,  अभियंता नगर येथील 28 वर्षीय महिला तर पेठेतील 65 वर्षीय वृद्ध महिलेचा  अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे .
   
रोज नवीन रुग्णांची भर पडत असून नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे असे आव्हान शंकर पाटील यांनी केले  आहे.

Post a Comment

0 Comments