Daily Mahasatta

Daily Mahasatta

मागेल त्याला शिवभोजन मिळावे : आ. सुधीरदादा गाडगीळ

सांगली (प्रतिनिधी) : सध्या महाराष्ट्र राज्य शासनाने १५ एप्रिल ते १ मे पर्यंत १५ दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीब जनतेसाठी कोरोनाच्या काळात शिवभोजन थाळी सर्वांना मोफत सोय केली आहे. तरी यामध्ये कामगार वर्गाचे काम बंद आहे. अशा लोकांना दिवसातून १ वेळचे तरी जेवण मिळाले पाहिजे अशा नागरिकांना तसेच लाभार्थींना शिवभोजन केंद्रामार्फत जेवणाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. या शिवभोजन केंद्रावर सध्या १५० नागरिकांना या थाळीचा लाभ घेता येत आहे. परंतु आता १५ दिवसांच्या ब्रेक द चेनच्या काळात शिवभोजनाचा लाभ मिळत नाही व लोक रिकाम्या हाती परत जात आहेत. त्यामुळे शिवभोजन थाळीच्या पुरवठ्यात वाढ करून १५० लोकांना मिळणारे भोजनात वाढ करून मागेल त्याला भोजनाचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे यांना मेल द्वारे व जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना समक्ष आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी , गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक संजय यमगर, राजेंद्र कुंभार, अशरफ वांकर, अतुल माने, महेश सागरे, रघुनाथ सरगर आदी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments