Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटा भाजीमंडईत सोशल डिस्टन्सींगचा फज्जा

विटा (प्रतिनिधी) : आगामी दोन तीन दिवसात राज्यात लाॅकडाऊन पडण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज सोमवारच्या आठवडी बाजारात मोठी गर्दी उसळली होती. विटा शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना भाजी आणि किराणा माल खरेदीच्या निमित्ताने सोशल डिस्टन्सींगचे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. 
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पहाता आगामी दोन तीन दिवसात लाॅकडाऊन पडणार असल्याने सर्वत्र खरेदीसाठी झुंबड उडत आहे. शहरातील किराणा माल दुकान आणि भाजी मंडई परिसरात लोकांची मोठी गर्दी झाली आहे. बहुतांश विक्रेते आणि नागरिकांच्या तोंडाला मास्क देखील लावण्यात आले नाहीत. विक्रेते एकमेकांच्या जवळपास बसल्याने सोशल डिस्टन्सींगचा देखील फज्जा उडाला आहे. मात्र आज पालिका प्रशासनाने नागरिकांना खुली सुट दिल्याचे दिसून येत आहे. 

उद्या मंगळवारी वर्षातील सर्वांत मोठा सण असलेला गुढी पाडवा साजरा होत आहे. किमान उद्या तरी गर्दी होणार नाही यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी. विटा शहर आणि तालुक्यात दररोज सुमारे २५ ते ३० कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडत आहे. याचा गांभीर्याने विचार करुन नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळावेत. तसेच जे नागरिक किंवा विक्रेते नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments