Daily Mahasatta

Daily Mahasatta

सोनहिराचा २१ वा गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न

कडेगाव (सचिन मोहिते) : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव, कदमनगर, वांगी, ( ता. कडेगांव ) या कारखान्याचा २१ वा गळीत हंगाम सांगता समारंभ शनिवार दिनांक १० रोजी संस्थेचे चेअरमन मा. आमदार वनश्री मोहनराव कदम यांचे शुभहस्ते साखर पोती पुजनाने शासनाचे कोरोना विषयीचे सर्व नियमांचे पालन करून संपन्न झाला.
यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन आमदार वनश्री मोहनराव कदम म्हणाले की, आपल्या कारखान्याने सन २०२० - २१ या २१व्या गळीत हंगामामध्ये १५८दिवसात ९, ४७, ४०५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून ११, ६७,६५०क्विटल साखर पोती उत्पादन झाले आहे. कारखान्याच्या सर्वच ऊस तोडणी – वाहतूक यंत्रणांनी चांगले काम केले. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला, तसेच शेती विभागाच्या तोडणी प्रोग्रॅमनुसार चांगल्या प्रतीचा ऊस तोड झाली. कोरोना महामारीचे संकट असतानासुध्दा आपण सर्वांनी कोरोना संदर्भातील योग्य ती काळजी घेतल्यामुळे हा २१ वा ऊस गळीत हंगाम यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रतीदिन ५ , ५००मे.टन ऊस गाळप क्षमता असतानासुध्दा जिल्ह्यामध्ये विक्रमी ऊस टनेज गाळप केले आहे. याचा मला निश्चीतच आनंद होत आहे. 

कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून १५९ दिवसात ६, ९०,६३,३०० युनिटस् वीजनिर्मिती झाली असून त्यापैकी कारखाना, कोजन व डिस्टीलरी प्रकल्पाकरिता २,३१, ८८, १४० युनिटस् वीज वापर झाला आहे आणि उर्वरीत ४,५ ८, ७५, १६०युनीटस् वीज विक्री महावितरण कंपणीस केली आहे. त्याचप्रमाणे डिस्टीलरीच्या मे. अल्फा लाव्हल प्रकल्पातून रेक्टीफाईड स्पिरीट ६३, ६७, २१३लिटर्स, प्राज इंडस्ट्रीज प्रकल्पातून रेक्टीफाईड स्पिरीट २०,४३, ३३४ लिटर्स आणि ई. एन.ए. २८,१८,२३३लिटर्स उत्पादन मिळाले आहे. हे दोन्ही प्रकल्प गळीत हंगाम सांगता समारंभ झालेनंतरसुध्दा पुढील काळात चालू राहणार आहेत. 

यावेळी सर्वाधीक ऊस वाहतूक ठेकेदार, तोडणी-वाहतूक ठेकेदार, सर्वाधीक बैलगाडी ऊस वाहतूक कामगार यांना उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल गौरविण्यात आले. तेव्हा पुढील गळीत हंगामासाठी आपण सर्व ऊस तोडणी –वाहतूक कंत्राटदार, मुकादम, मजूर यांनी हा कारखाना आपला आहे असे समजून कारखान्याकडे जास्तीत-जास्त तोडणी-वाहतूक करार करुन योग्य सहकार्य करावे असे सांगण्यात आले . या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तावीक मनोगत शेती अधिकारी प्रशांत कणसे यांनी केले व आभार उपशेती अधिकारी वैभव जाधव यांनी मानले.

या प्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन पोपटराव महिंद, संचालक निवृत्ती जगदाळे, बापुसो पाटील, युवराज कदम तसेच खातेप्रमुख, विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments