Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत भाजपा तर्फे कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम

सांगली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या वतीने कोविड-१९ लसीकरण मोहीम बाबत जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली. यासाठी रुग्ण सेवा प्रकल्प मिरज यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. 

जनजागृती मोहिमीची सुरुवात सुधीरदादा गाडगीळ व जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संघटक सरचिटणीस दीपक माने, जिल्हापरिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, डॉ. भालचंद्र साठे, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक गजानन मगदूम, संजय कुलकर्णी , नगरसेविका अप्सराताई वायदंडे, साविताताई मदने, अरुणदादा दांडेकर, गिरीश भट, योगेश कुलकर्णी, प्रणव गुडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments