Daily Mahasatta

Daily Mahasatta

ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी)
नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टँक मधील ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात आज ऑक्सिजन घेऊन आलेल्या टँकर मधून अचानक गळतीला सुरवात झाली. या रुग्णालयात २३ रुग्ण व्हेंटीलेटरवर होते. गळती झाल्यामुळे या रुग्णांना सुमारे पंधरा ते वीस मिनिटे ऑक्सिजन पुरवठा पूर्णतः बंद झाला. त्यामुळे २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीं नातेवाईकांनी सांगितले. या घटनेनंतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश सुरु केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून हाॅस्पीटल परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली.
...................................
आयुक्तांवर गुन्हा
दाखल करा : प्रविण दरेकर

शासनाने आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. रुग्णालयात मेंटेनन्स करणे गरजेचे होते. त्यामुळे सामान्य कामगारांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments