Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात २६४ कोरोना पाॅझिटीव्ह, पहा तालुकानिहाय आकडेवारी

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात आज रविवार ता. ४ एप्रिल रोजी २६४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून दिवसभरात तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यभरात कोरोना चा कहर सुरुच आहे. त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. आज रविवारी दिवसभरात २६४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक १०७ रुग्णांचा समावेश आहे. तर कवठेमंहकाळ तालुक्यात आज सर्वांत कमी म्हणजे ६ रुग्ण आढळून आले आहेत.

सांगली जिल्ह्यात आज तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी -१७ ,जत -२६ , कडेगाव- २६ , कवठेमंहकाळ- ६ , खानापूर- १६ , मिरज -७ , पलूस - १४ , शिराळा - ७, तासगाव- २०, वाळवा - १८ , आणि महापालिका क्षेत्रात सांगली शहर- ७८ आणि मिरज शहर- २९ असे सांगली जिल्ह्यात एकूण २६४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आज जिल्हयात १६१ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Post a Comment

0 Comments