Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात ८३० कोरोना पॉझिटीव्ह

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात ८३० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर दिवसभरात १४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आज रविवार ता. १८ रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील ८३० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सांगली जिल्ह्यात सद्या प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. सुमारे एक हजारच्या आसपास दररोज नवीन रुग्णांची वाढ होत आहे.

आज सांगली जिल्ह्यातील १४ जणांना कोरोना मुळे प्राण गमवावा लागला आहे. तर ३७३ जणांनी आज कोरोना वर मात केली आहे. आज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ८७, जत ४६, कडेगाव ५४, कवठेमंहकाळ १०, खानापूर १०६, मिरज ९७, पलूस ३८, शिराळा २५४ , तासगाव ७९, वाळवा १०२ तसेच सांगली शहर १०६ आणि मिरज शहर ५१ असा सांगली जिल्ह्यातील ८३० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ७ हजार ०५३ रुग्ण उपचाराखाली आहेत. 

Post a Comment

0 Comments