Daily Mahasatta

Daily Mahasatta

कवठेमहांकाळ तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी गोरख चव्हाण

कवठेमहांकाळ, (अभिषेक साळुंखे)
येथील तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी खरशिंगचे पोलीस पाटील गोरख चव्हाण तर, उपाध्यक्षपदी ढोलेवाडीचे पोलीस पाटील कृष्णा चोरमुले, महिला उपाध्यक्षपदी अलका सुतार यांची बिनविरोध निवड झाली.

पोलीस पाटील संघटनेच्या झालेल्या बैठकीत विविध निवडी करण्यात आल्या. यामध्ये सचिवपदी घाटनांद्रेचे महादेव शिंदे , सहसचिवपदी जायगव्हाणचे दीपक पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडीबद्दल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे , पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांच्याहस्ते सत्कार झाला . यावेळी रामचंद्र पाटील, सुनील चव्हाण, नामदेव भुसनुर, मनोज जाधव, वर्षाराणी चव्हाण, माधुरी सरक, डॉ. स्नेहल कवठेकर, विद्या साखरे, जगन्नाथ बागले, गौतम माने, सचिन खोत, रणजीत पाटील उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments