Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात ट्रॅक्टर चोरटा गजाआड

इस्लामपूर (सूर्यकांत शिंदे) : ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी करणाऱ्या एकास इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय मच्छिंद्र कावरे ( वय २२ )रा. करवडी ता. कराड सध्या रा. कृष्णानाका वाखन,सरस्वती विदयालयाजवळ, ता. कराड जि. सातारा असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून त्याच्याकडून ट्रॅक्टर व ढम्पिंग ट्रॉली असा एकूण ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अक्षय कावरे हा भावानीनगर ते बिचुद जाणारे रोडवर संशयीत रित्या फिरताना आढळला. तदनंतर त्याला ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीदारांच्या मदतीने कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील डंपींग ट्रॉलीची चोरी केल्याचे कबुली दिली. चोरीची कबुली दिल्यानंतर त्याला अटक केली. इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरी गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशानेपोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम , अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे व पो नि. नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपुर पोलीस ठाणे कडील
सपोनि प्रविण साळुखे, पो. ना. उत्तम माळी, पोहेकॉ .गणेश मोहिते, पोहेकॉ. सोमनाथ पाटील, पो.कॉ.गणेश शेळके, पो. कॉ. योगेश जाधव, पो.कॉ. उमेश शेटे या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments