Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन, आज रात्री ८ पासून जिल्हाबंदी जाहिर

मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात आज गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक लाॅकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. आज २२ एप्रिल ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध राहणार आहेत. सरकारी कार्यालयात केवळ १५ टक्के तर अत्यावश्यक सेवेतील कार्यालयात ५० टक्के कर्मचार्यांना उपस्थित राहता येणार आहे. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी तर अवघ्या 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे.

पहा नेमके नियम कोणते?

1. आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन
2. ‘1 मे’च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन
3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद
4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद
5. राज्यात जिल्हा बंदी लागू
6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी
8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
9. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार
10. एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार
11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा
12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड
13. सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती
14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार
15. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी
16. लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार
17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार
18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक
19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार
20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार.

 




 

 




 




 














 

Post a comment

0 Comments