Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात ४८७ कोरोना पॉझिटीव्ह, पहा तालुकानिहाय आकडेवारी


सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरुच असून
आज ४८७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आज सांगली शहरात ११२ तर मिरज शहरात ५१ रुग्ण आढळून आले .

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागासह महापालिकेच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका क्षेत्रात दररोज शंभर नवीन रुग्णांची भर पडत होती. आज यामध्ये वाढ होऊन आज १६३ रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे: आटपाडी ९ ,जत १५ कडेगाव ४३ कवठेमंहकाळ ९, खानापूर ६६, मिरज ६१, पलूस १४, शिराळा १४, तासगाव ३९ , वाळवा- ५४, तसेच सांगली शहर ११२ तर मिरज शहर ५१ असे जिल्ह्यात एकूण ४८७ इतके रुग्ण आढळून आले आहेत. 

Post a Comment

0 Comments