Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत मृत्यूचे तांडव सुरुच, कोरोनाने आज १७ जणांचा बळी

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आता मृत्यूचे देखील तांडव सुरु झाले आहे. आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात १७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. गेल्या आठ दिवसांत कोरोनामुळे सुमारे सत्तर नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या विदारक परिस्थितीबाबत तातडीची पत्रकार बैठक घेत आगामी दहा दिवसात आणखी चिंताजनक परिस्थिती येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी यांनी दिला आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. काल बुधवारी दिवसभरात उच्चांकी ७६२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता तर आज गुरुवारी ९२१ इतके उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाने केलेल्या सर्व सुविधा अपुर्या पडत आहेत. रुग्ण वाढीबरोबर आता उपचारादरम्यान बळी जाणारांचा आकडा वाढत आहे. आज सर्वांत अधिक म्हणजे १७ जणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. मृत्यू झालेल्या मध्ये खानापूर ३, कडेगाव १, जत १, कवठेमंहकाळ १, मिरज २, पलूस २, शिराळा १, वाळवा ५, मिरज १ असे एकूण सांगली जिल्ह्यातील १७ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
तालुक्यात १ असे एकूण १० जणांना प्राण गमवावा लागला.

आज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ३८, जत ८४, कडेगाव ८६ कवठेमंहकाळ ४९, खानापूर ९०, मिरज ८६, पलूस ३३, शिराळा २२, तासगाव ६१, वाळवा १७९, तसेच सांगली शहर १३० आणि मिरज शहर ६३ असा सांगली जिल्ह्यातील ९२१ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ५ हजार ५२८ रुग्ण उपचाराखाली आहेत.
-------------------------------
वाळवा तालुक्यात
उच्चांकी १७९ पाॅझिटीव्ह


वाळवा तालुक्यात आज उच्चांकी १७९ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले तर ७ जणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. तसेच खानापूर तालुक्यात देखील आज ९० रुग्ण आढळून आले असून ३ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे.

Post a Comment

0 Comments