Daily Mahasatta

Daily Mahasatta

लसीकरण व कोरोना चाचणीतील अडचणी सोडवू : आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली (प्रतिनिधी) : शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या लसीकरण व कोरोना चाचणीतील अडचणी सोडवू अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व आरोग्य केंद्रांवर नागरिकांना लसीकरण तसेच कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत. तसेच १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस उपलब्ध होणार असल्याने सांगली विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागतील आरोग्य केंद्रावर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी महानगरपालिका क्षेत्रातील व ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली यावेळी त्यांना अनेक त्रुटी आढळल्या. काही ठिकाणी नागरिकांची बसण्याची सोय नव्हती. लस घेतल्यावर नागरिकांना विश्रांतीसाठी सुविधा नव्हती. 

तीव्र उन्हाच्या झळा असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी येथे पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. तसेच काही ठिकाणी शौचालायचा अभावही दिसला काही ठिकाणी कर्मचारी अपुरे असल्यामुळे इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असल्याचेही त्यांना दिसून आले. महापालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1 जामवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 2 साखर कारखाना, सांगली प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 3 शामरावनगर सांगली, प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 4 हनुमान नगर सांगली, प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 5 विश्रामबाग सांगली, व प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 6 अभयनगर सांगली व हरिपूर, नांद्रे, बुधगाव, माधवनगर, बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरील लसीकरण केंद्रावर येथील शासकीय लसीकरण केंद्रावर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी अचानक भेट देऊन संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कोरोना प्रतिबंधक लसीकरण तसेच कोरोना रुग्णांच्या अँटिजिन व RTPCR टेस्ट बाबतची माहिती घेतली. 

तसेच डॉ. राम लाडे यांच्या विवेकानंद कोविड रुग्णालय येथे भेट देऊन तेथील ऍडमिट असणारे रुग्ण यांची माहिती घेतली, व कोविड प्रतिबंधक लस पात्र नागरिकांना योग्य प्रकारे मिळते का नाही याचा आढावा घेतला. काही अडचणी येत आहेत याबद्दल माहिती घेतली आरोग्य केंद्रांवर लसीकरण तसेच कोरोना चाचणी करताना अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. याबाबत लवकरच प्रशासनाशी संपर्क साधून हे अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. 

यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी, संजय यमगर, विश्वजीत पाटील, अश्रफ वांकर, अक्षय पाटील, रघुनाथ सरगर, इम्रान शेख, दरीबा बंडगर, सचिन बालनाईक, विक्रम पाटील, राहुल सकळे, सरपंच राजेश संन्नोळी, माधवनगरचे सरपंच अनिल पाटील, उपसरपंच बाळासाहेब मगदूम, संतोष सरगर, किरण भोसले, कृष्णा राठोड, युवराज बोंद्रे, महेश हणबर, सतीश खंडागळे, गणपती साळुंखे, अमित गडदे, विनायक शिंदे, विजय गोसावी, राजेंद्र शिवकाळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments