Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी आम.सदाशिवभाऊ पाटील यांचा मोठा निर्णय

विटा (प्रतिनिधी) : विटा नगरीचे आराध्यदैवत श्री नाथ मंदिर येथे सालाबाद प्रमाणे पाडवा सणानिमित्त सर्व यात्रा कमिटी सदस्यांची होणारी बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी दिली आहे. 

माजी आमदार सदाशिव पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिवसाची जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू केलेने यात्रा उत्सव तसेच सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. या अनुषंगाने विटा नगरीचे आराध्यदैवत श्री नाथ मंदिर येथे सालाबाद प्रमाणे पाडवा सणानिमित्त सर्व यात्रा कमिटी व गावकरी लिंब खाण्याच्या, पंचांग वाचनाच्या व नाथाअष्टमी यात्रेच्या नियोजनाच्या निमित्ताने एकत्र येत असतात. व हा सण आनंदाने साजरा करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारी मुळे ही बैठक स्थगित करण्याचा निर्णय सर्वानुमते आज आम्ही घेत आहोत.

मात्र देवाची पाडव्याची पूजा हि मानकरी व गुरव यांच्या हस्ते रितीरिवाजाप्रमाणे होईल. मी आपणा सर्वांना विनंती करतो की पाडव्याच्या सणा दिवशी मंदिरात गर्दी करू नये सर्वांनी आपापल्या घरी सण उत्साहात साजरा करावा त्याचबरोबर प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करून स्वतःला व कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवावे मी या निमित्ताने नाथ बाबा चरणी प्रार्थना करतो की विटा शहर हे पूर्णपणे कोरना मुक्त होऊन लवकरात लवकर पहिल्यासारखे गुण्यागोविंदाने नांदावे आणि सर्वांच्या उद्योग-व्यवसायत भरभराटी येऊन सर्व विटेकर जनता समृद्ध व्हावी असे प्रतिपादन अॅड सदाशिवराव पाटील पत्रकारांशी बोलताना केले.

Post a Comment

0 Comments