Daily Mahasatta

Daily Mahasatta

पी.व्ही.पी. महाविद्यालयात डॉ.आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

कवठेमहांकाळ (प्रतिनिधी) : येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील, महाविद्यालया  मध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने आणि कोरोना संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रबंधक  राजेंद्र स्वामी आणि संख्याशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक विजय कोष्टी  यांच्या हस्ते  भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर सर्वांनी  त्यांना आदरांजली वाहीली.  यावेळी बोलताना प्रा. कवि सुनील तोरणे यांनी बाबासाहेबांच्या महान कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभारप्रदर्शन आणि सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. दिलीप गाडे यांनी केले. यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव सुदर्शन शिंदे, महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. मोहन लोंढे, प्रा. किरण सकट, तानाजी थोरात,बी.टी. चंदनशिवे, आनंदा चव्हाण, रमेश पवार, हणमंत पवार, मोतीलाल पवार आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, प्र. प्राचार्य डॉ.एम. के. पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन मोठ्या उत्साहात आणि शारीरिक अंतराचे नियम पाळून करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments