गलाई व्यावसायिक मा. संदिपशेठ कदम यांनी देखील खरसुंडी येथील आराध्य दैवत सिध्दनाथांच्या चरणी अनिलभाऊंच्या प्रकृतित सुधारणा होउ दे भाऊंच्या वजनाएवढ्या पेढ्यांची तुला करतो, असा नवस केला होता. तो आज खरसुंडी येथे येऊन पूर्ण केला.
विटा (प्रतिनिधी)
काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर यांना कोरोना ची लागण झाली होती. आपला नेता या संकाटावर मात करून ठणठणीत व्हावा, यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी देवाला साकडे घातले होते. अशाच एका कार्यकर्त्यांने आज खरसुंडीच्या सिद्धनाथ मंदिरात आमदार अनिलभाऊ बाबर यांची पेढ्यात तुला करुन हे पेढे भाविकांना वाटले.
खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अनिलभाऊ बाबर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. जनतेची सेवा करता करता भाऊंना कोरोनाची लागण झाली होती. संपूर्ण मतदारसंघात हळहळ व्यक्त होत होती, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या होत्या. देवाला साकडे घातले होते. आटपाडी तालुक्यातील कौठुळी चे सुपूत्र व यवतमाळ येथील गलाई व्यावसायिक मा. संदिपशेठ कदम यांनी देखील खरसुंडी येथील आराध्य दैवत सिध्दनाथांच्या चरणी भाऊंच्या प्रकृतित सुधारणा होउ दे भाऊंच्या वजनाएवढ्या पेढ्यांची तुला करतो, असा नवस केला होता. तो आज खरसुंडी येथे येऊन पूर्ण केला. कार्यकर्त्यांच्या या अनोख्या प्रेमाने आमदार अनिलभाऊ बाबर भावुुुक झाल्याचे दिसून आलेे.

यावेळी आटपाडी तालुक्याचे नेते मा. तानाजीराव पाटील अध्यक्ष, तालुकाप्रमुख मा. साहेबराव पाटील, माजी सरपंच मा. चंद्रकांतभाऊ पुजारी, माजी उपसरपंच मा. अर्जुन सावकार, युवा सेनाप्रमुख मा. संतोष पुजारी, मा. रावसाहेब सागर, मंगेश पुजारी, मा. किशोर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
0 Comments