Daily Mahasatta

Daily Mahasatta

रघुराज मेटकरी यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर

विटा (प्रतिनिधी) : उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार साहित्यीक रघुराज मेटकरी यांच्या 'स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्ण रत्ने' या पुस्तकासाठी जाहीर झालेला आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पाच हजार रुपये, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे आहे.

भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनकरराव पाटील यांनी हे पुरस्कार जाहीर केलेले आहेत. पुरस्कार निवड समितीत प्रा. सौ. किर्ती राहुल कदम, इंजिनीयर अजिंक्य पाटील, प्रा. धनाजी वाघ, प्रा. तानाजी निकम व प्रा. डॉ. दिनकरराव पाटील यांनी काम पाहिले.
रघुराज मेटकरी यांना या पुर्वी महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा ग. ह. पाटील पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार,महाराष्ट्र राज्याचा व्यसनमुक्ती कार्य पुरस्कार, विनोद प्रतिष्ठान पुणे चा आचार्य अत्रे पुरस्कार,दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 

मेटकरी यांना 'यशवंतराव चव्हाण' यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याने साहित्य वर्तुळात आनंद व्यक्त होत आहे. रघुराज मेटकरी हे विटा येथे गेली ३९ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करतात.

Post a Comment

0 Comments