Daily Mahasatta

Daily Mahasatta

भिलवडीत बाळासाहेब मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार

भिलवडी (खंडेराव मोरे) : सामाजिक बांधिलकी जपणारे युवकांचे प्रेरणास्थान बाळासाहेब (काका) मोहिते यांचा वाढदिवस कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्ध्यांना सन्मानित करून साधेपणाने साजरा करण्यात आला.

भिलवडी दक्षिण भाग सोसायटीचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब (काका) मोहिते यांनी आज अखेर सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची पलुस तालुक्यांमध्ये ओळख आहे. माजी दिवंगत मंत्री डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब व भिलवडी गावचे लोकनेते स्व. बाळासाहेब (काका) पाटील व महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आनंदराव भाऊ मोहिते यांच्यामार्गदर्शनाखाली त्यांनी मोठ्या जोमाने स्वतःला झोकून देऊन काँग्रेस पक्षाचे कार्य केले.

सध्या ते कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करीत आहेत. महापूराच्या काळातील बाळासाहेब (काका) मोहिते यांच्यासह मोहिते कुटुंबीयांचे कार्य उल्लेखनीय आहे. बाळासाहेब (काका) मोहिते हे दक्षिण भाग सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत. गेल्या वर्षी सुरू झालेल्या कोरोनाच्या महामारीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिलवडी गावच्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यामुळे भिलवडी गावात सुरवातीच्या कालावधीत कोरोनावर अंकुश ठेवण्यात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीला यश आले होते. 

सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये मिसळून, नेहमी त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारे बाळासाहेब (काका) मोहिते यांचा वाढदिवस कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोणताही लवाजमा न करता, कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत, साधा व घरगुती पद्धतीने करण्यात आला. बाळासाहेब (काका) मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेब (काका)मोहिते युवा मंच भिलवडी यांच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, भिलवडी पोलीस प्रशासन,महावितरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन समिती भिलवडी व पत्रकार बांधवांना मास्क, सॅनिट्रायझर,रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सोनिक अल्बम गोळ्या, मिठाई व सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

दरम्यान बाळासाहेब (काका) मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आ.मोहनराव कदम,जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, जितेश (भैय्या) कदम, महेंद्र (आप्पा) लाड, महादेव (नाना) पाटील, तासगावचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय रेंदाळकर, भिलवडी गावचे माजी सरपंच विजयकुमार चोपडे यांनी दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. तर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र (भैय्या) वाळवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम (दादा )पाटील, शहाजी गुरव, बाबासाहेब मोहिते, वसंतरावजी मोहिते, ग्रा.पं.सदस्य मनोज चौगुले,जावेद तांबोळी, कपिल शेटे, श्रीकांत गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी तसेच बाळासाहेब (काका) मोहिते युवा मंच भिलवडी, जय किसान ग्रुप भिलवडी व हरण्या प्रेमी ग्रुपच्या वतीने बाळासाहेब (काका ) मोहिते यांना जन्मदिनानिमित्त प्रत्यक्ष भेटून, मास्क, सॅनिट्रायझरचा वापर करीत सोशलडिस्टन्सिंगचे पालन करीत शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी बाळासाहेब ( काका) मोहिते युवा मंचचे अध्यक्ष रणजित देसाई, सचिव अनिल उर्फ पिनू खराडे यांनी चोख नियोजन केले होते.

Post a Comment

0 Comments