Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ आणि परिसरात सातजण कोरोना पाॅझिटीव्ह

पेठ (रियाज मुल्ला)
पेठ व पेठ परिसरात आज एकूण ७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली.

पेठ गावातील २ पुरुष, वाघवाडी येथील १ पुरुष ,रेठरेधरण येथील २ पुरुष व १ महिला असे 3 जण तर ओझर्डे येथील १ पुरुष अशा एकूण ७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रोज नवीन रुग्णांची भर पडत असून नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
वाळवे तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्यात वाढली असून,नागरिकांनी अति महत्वाच्या कामा व्यतिरिक्त बाहेर पडणे टाळावे, गर्दीचे ठिकाणे टाळावीत, मास्क चा वापर करावा. लॉकडाऊनचे पालन करावे असे आव्हान शंकर पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments