Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगली जिल्ह्यात २८४ कोरोना पॉझिटीव्ह

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात आज गुरुवार ता. १ एप्रिल रोजी २८४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून दिवसभरात चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता प्रशासनाने निर्बंध अधिक कठोर केले आहेत. मात्र दिवसेंदिवस सांगली जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आज गुरुवारी दिवसभरात २८४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक ९२ रुग्णांचा समावेश आहे. तर तासगाव तालुक्यात आज सर्वांत कमी म्हणजे ६ रुग्ण आढळून आले आहेत.

सांगली जिल्ह्यात आज तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी -२९ ,जत -१५ , कडेगाव- १० , कवठेमंहकाळ- १७ , खानापूर- २८ , मिरज -१९ , पलूस - ९ , शिराळा - १८, तासगाव- ६ , वाळवा - ४१ , आणि महापालिका क्षेत्रात सांगली शहर- ५४ आणि मिरज शहर- ३८ असे सांगली जिल्ह्यात एकूण २८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आज जिल्हयात ६३ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Post a Comment

0 Comments