Daily Mahasatta

Daily Mahasatta

महाराष्ट्रात १५ दिवसाचा कठोर लाॅकडाऊन

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. तर दुसरीकडे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्यात सद्या कोरोनाची अॅक्टीव रुग्ण संख्या आता ६ लाखांच्यावर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये १५ दिवसाच्या कठोर लाॅकडाऊनवर एकमत झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत.

राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि बेडचा तुडवडा निर्माण झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तर दुसरीकडे नागरीक शासनाच्या निर्बंधांची पायमल्ली करत मोकाट फिरत आहेत. आगामी १० ते १५ दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडून रुग्ण रस्त्यावर येऊन भीषण अवस्था येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावली. यामध्ये सर्वच मंत्री महोदयांनी राज्यात किमान १५ दिवसाचा कठोर लाॅकडाऊन लावण्याची मागणी केली आहे.

या लाॅकडाऊन मध्ये दुध, भाजीपाला, किराणा माल, कृषीची दुकाने ही सुद्धा केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मर्यादीत वेळेत सुरु राहतील. तसेच जिल्ह्याच्या सीमाबंदी करणे, प्रवासावर बंधने येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत उद्या अधिकृत घोषणा करणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. 
----------------------------

दहावीची परीक्षा रद्द 
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर बारावीची परिक्षा घेतली जाणार आहे. बारावी च्या परिक्षेबाबत लवकरच सुचना जाहिर केली जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments