Daily Mahasatta

Daily Mahasatta

लसीकरण आणि कोरोना चाचणी नसेल तर फळ मार्केटमध्ये नो एंट्री

: महापालिकेच्या सुचनेनंतर बाजार समितीचा निर्णय 

सांगली (प्रतिनिधी) : विष्णु अण्णा फळ मार्केट मध्ये सौदयासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना कोरोनाचा फैलाव रोखता यावा यासाठी आता येथे येणाऱ्या प्रत्येक 45 वर्षावरील व्यक्तीने आपले लसीकरण आणि 45 पेक्षा कमी वय असणाऱ्यानी आपली आर्टिपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर लसीकरण किंवा टेस्ट रिपोर्ट सोबत नसेल तर कोणालाही फळ मार्केटमध्ये प्रवेश दिला नाही. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सुचनेनंतर बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान सकाळी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय टीमने फळ मार्केट मधील ४० जणांची अँटीजन चाचणी घेण्यात आली.

कोल्हापूर रोडवरील विष्णूअण्णा फळ मार्केट आवारात सकाळी फळांच्या सौद्यासाठी व्यापारी, हमाल, अडते, तोलाईदर, मालवाहतूक करणारे वाहनचालक, नागरिक, खरेदीदार तसेच नागरिकांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर फळ मार्केटमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार आज उपायुक्त राहुल रोकडे आणि वैद्यकीय टीमने फळ मार्केट मधील ४० जणांची अँटीजन टेस्ट घेतली. यामध्ये कोणीही पॉझिटीव्ह आढळून आले नाही मात्र सौद्यासाठी होत असणारी गर्दी आणि यातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन या सौद्यासाठी येणाऱ्या ४५ वर्षावरील प्रत्येकाने आपले कोरोना लसीकरण केलेलं असावे किंवा ४५ पेक्षा कमी वय असणाऱ्या सर्वानी आपली आर्टिपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे सर्टिफिकेट सोबत आणणे आवश्यक आहे. 

पंचेचाळीस वर्षावरील जे व्यापारी, विक्रेते, हमाल, तोलाईदर,अडते, तसेच होलसेलर ज्यांचे वय ४५ पेक्षा जास्त आहे त्यांनी आपले कोरोना लसीकरण अद्याप केले नाही त्यांनी सोमवारपूर्वी करून घ्यावे आणि ज्यांचे वय ४५ पेक्षा कमी आहे अशा सर्वानी आपला आर्टिपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. अशी सूचना उपायुक्त राहुल रोकडे यांनी बाजार समिती संचालक मुनिर जांभळीकर, सचिव चव्हाण, सहायक सचिव सरडे यांना केली आहे. तसेच बाजार समितीनेही सोमवारपासून कोरोना लसीकरण आणि आर्टिपीसीआर चाचणी नसणाऱ्याना विष्णु अण्णा फळ मार्केट मध्ये प्रवेश करण्यास आणि सौदयाच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यास बंदी घातली जाईल अशी ग्वाही संचालक मुनिर जांभळीकर यांनी उपायुक्त रोकडे यांना दिली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ शीतल धनवडे यांच्यासह हनुमाननगर आरोग्यवर्धिनी केंद्राचा सर्व वैद्यकीय स्टाफ उपस्थित होता. तसेच सहायक आयुक्त एस एस खरात, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वछता निरीक्षक कोमल कुदळे, धनंजय कांबळे, प्रणिल माने, किशोर कांबळे, राजू गोंधळे, वैभव कांबळे आदीनी या सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments