
लसीकरण पुर्ववत होण्यास २४ ते ४८ तास लागणार.
शिराळा (विनायक गायकवाड) : शिराळा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि शिराळा उपजिल्हा रुग्णालय यामध्ये गुरुवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेपर्यंत पुरेल इतक्याच कोरोना वरील लसी शिल्लक आहेत. ८ एप्रिल दुपारपासून तालुक्यात सगळीकडे कोरोना वरील लसीचा तुटवडा जाणवणार आहे.
सांगली सिव्हील हॉस्पिटल कडून जोपर्यंत लसीचा पुरवठा होत नाही तोपर्यंत नागरिकांना लस उपलब्ध होणार नाही. शुक्रवारी दुपारी किंवा शनिवारी सकाळपासून कोरणावरील लसीकरण पूर्ववत सुरू होईल. तोपर्यंत तालुक्यातील नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. कोरोना वरील अँटीजेन व आर. टी. पी. सी. आर. चाचण्या सुरू आहेत. नागरिकांनी त्रास जाणवू लागल्यानंतर दिरंगाई न करता जवळच्या आरोग्य केंद्राशी भेट द्यावी आणि योग्य ते औषधोपचार करून घ्यावेत.
0 Comments