Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात लसीकरणास मोठा प्रतिसाद

कुपवाड (प्रमोद अथणिकर) : कुपवाड मध्ये महानगरपालिका तर्फे कोरोना ची लस देण्याचे काम चालू असून आज रोजी 3 हजार 399 लोकांना लस देण्यात आली आहे.

कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून कुपवाड मध्ये मनपा मधील कर्मचाऱ्यांनी अथांग परिश्रमाने 45 वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे काम चालू असून आता पर्यन्त 60 वयोगटातील 1553 जणांना यशस्वी लसीकरण करण्यात आले , 45 वयोगटातील 1540 नागरिकांना लस देण्यात आली , सरकारी नोकरदार 167 जणांना तर वैधकिय कर्मचारी 76 जणांना व दुसरा डोस 59 जणांना असे एकूण आज अखेर 3 हजार 399 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.

यासाठी महानगरपालिका चे वैद्यकीय अधिकारी
मयूर औंधकर व पथकातील खंडेराव भाले, प्रियांका माळी, संपदा मदने, ज्योती कांबळे, मनिषा माळवदे आदींनी अथग परिश्रम तुन नागरीकांना लसीकरणाचे डोस देण्याचे काम चालू आहे.

Post a Comment

0 Comments