Daily Mahasatta

Daily Mahasatta

मिरजेत २०० बेडचे कोव्हीड सेंटर उभारणार : महापौर दिग्विजय सुर्यवंशी


सांगली (प्रतिनिधी)
मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये १०० ऑक्सिजन बेडसह २०० बेडचे कोविड केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित करुन नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.


महापौर दिग्विजय सुर्यवंशी म्हणाले, सांगली मिरज आणि कुपवाड शहरासह परिसरात सध्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. आगामी संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी आणि असलेल्या उपाययोजना यांची माहिती घेण्यासाठी आज मा. महापौर श्री. दिग्विजय सुर्यवंशी, उप-आयुक्त स्मृती पाटील व वैद्यकीय अधिकारी यांच्या समवेत मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालया मध्ये उपस्थित राहुन रुग्ण व वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

ऑक्सिजन युक्त बेड आणि अन्य काही आधुनिक सुविधा उपलब्धता करुन देणे आवश्यक आहे. यावर निर्णय झाला आहे. त्यांनुसार आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये १०० ऑक्सिजन बेडसह २०० बेडचे कोविड केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित करुन नागरिकांना वैद्यकीय सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर तिन्ही शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर यांच्याशी संवाद साधून एक तज्ञ समिती नियुक्त करुन होम आयसोलेशन सह अन्य कोरोना बाधित रुग्णांना फोन द्वारे वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देऊन दिलासा देणेचा देखील प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे. यावेळी उपमहापौर श्री. उमेश पाटील, नगरसेवक श्री. शेडजी मोहिते, नगरसेविका मा. वहिदा नायकवडी व महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments