Daily Mahasatta

Daily Mahasatta

वांगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदनिर्मितीस मान्यता : मंत्री डाॅ विश्वजीत कदम

कडेगाव (सचिन मोहिते) : कडेगाव तालुक्यातील वांगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदनिर्मितीच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत, अशी माहिती कृषी राज्य मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी दिली आहे. 

मंत्री कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. आज मी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे साहेबांची भेट घेतली व कडेगाव तालुक्यातील वांगी येथील स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम साहेबांनी मंजूर करून आणलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदनिर्मितीच्या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती केली. आरोग्य मंत्री महोदयांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून पदनिर्मितीच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे आदेश दिले. वांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ वांगीसह , शेळकबाव, शिवणी, हिंगणगांव खुर्द, अंबक, शिरगाव, रामापूर, तडसर या गावांना व उपकेंद्रना होणार आहे, अशी माहिती राज्य मंत्री डाॅ विश्वजीत कदम यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments