Daily Mahasatta

Daily Mahasatta

विजय पाटील यांचे वक्तव्य बालीशपणाचे : उदय शिंदे

वाळवा (रहिम पठाण)
आमचे नेते जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी कोणतीही भूमिका जाहीर करण्याआधी विजय पाटील यांनी केलेले वक्तव्य हे बालीशपणाचे लक्षण आहे, अशी टीका आज बोरगांव तालुका वाळवा येथे राजारामबापू सह. सूतगिरणीचे संचालक मा. उदय शिंदे यांनी बोरगावमध्ये कार्यकर्त्यांशी बोलत होते.

वाळवा राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधू नये, असे आव्हान यावेळी त्यांनी केले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक पॅनेलचा विजय निश्चित आहे,’’ असेही ते बोलताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले की विजय पाटील यांनी साखराळे येथे भोसले गटाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना पाठिंबा देत आपली भूमिका जाहीर केली. वास्तविक आमचे नेते जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी कोणतीही भूमिका जाहीर करण्याआधी विजय पाटील यांनी केलेले वक्तव्य हे बालीशपणाचे लक्षण आहे.

‘‘जयंत पाटील यांचे खच्चीकरण करण्यासाठी भोसले गटाने अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. इतिहासाचा उलगडा केला तर ज्यावेळी जनता पक्षातून (स्व.) राजारामबापू पाटील हे निवडणूक लढवीत असताना (स्व.) जयवंतराव भोसले हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. विधानसभेच्या 1985 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा कमी वयाचा दाखला देऊन त्यांचा पत्ता कट करण्यात भोसले कुटुंबीय आघाडीवर होते. जयवंत शुगर उभारणी करताना पेठ परिसरात जागेची चाचपणी केली होती. या भागात सक्षम कारखाने असल्याने लोकांनी त्यांना विरोध केला, हे विसरू नये, असे शिंदे यांनी नमूद केले आहे.

या वेळी कृष्णा कारखान्याचे माजी संचालक सुरेश पाटील, सुभाष पाटील, संभाजी दमामे, केदार शिंदे , वसंतराव पाटील, महेश पवार, शिवराज जाधव, सुहास पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments