Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठच्या बिरोबा यात्रेबद्दल मोठा निर्णय

पेठ (रियाज मुल्ला)
कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पेठ येथील बिरोबा मंदिर (वाघवाडी) येथील गुढीपाडवा निमित्ताने होणारी यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंदिराचे पुजारी यशवंत येडगे यांनी दिली आहे.

शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारा बिरुदेव अशी आख्यायिका असून श्रद्धा असणारे हजारो भाविक याठिकाणीं नवस बोलतात अन फेडतात. यात्रेच्या मुख्य दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून भांडाऱ्याची उधळण करीत ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात येत असते.
भाकणूक , हेडाम, लहान मुलांना कंबळ्यात झेलने, मंदीर परिसरात मेंढरे पळविणे आदी धार्मिक विधी यात्रेच्या मुख्य दिवशी होत असतात.

मात्र कोरोनाच्या रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता यावर्षी सर्वानुमते यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रोहित मस्के, अमोल गावडे, संजय जानकर, आनंदा गावडे, शिवाजी मस्के, सयाजी गावडे, दुळदेव गावडे, शैलेश गावडे, संग्राम गावडे, भरत करे, आबा गावडे, सचिन करे, अशोक मस्के, कृष्णात येडगे, अक्षय गावडे, कृष्णात करे, बबन मस्के, संजय करे आधी मान्यवर, पुजारी व धनगर समाज उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments