Daily Mahasatta

Daily Mahasatta

पलुस तालुक्यात कोरोनाचा कहर; प्रशासनाची चिंता वाढली

पलुस (अमर मुल्ला) : कोरोना चा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे . पलूस तालुक्यात आज शुक्रवार दिनांक २३ रोजी १५ गावात ७१ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

संचारबंदी लागू असली तरी विनाकारण रस्त्यावर फिरणारांची संख्या जास्त दिसत आहे .पलुस तालुक्यात कोरोना चा एकूण आकडा ३१७१ वर पोहचला आहे. यापैकी बरे झालेले रुग्ण २७१५ असून उपचार घेत असलेले रुग्ण ३५४ आहेत.
शुक्रवार पलुस तालुक्यात गावनिहाय कोरोना रूग्ण संख्या पुढीलप्रमाणे- पलुस ३१ , कुंडल ५ , किर्लोस्करवाडी ६ , पुणदी १४, सावंतपूर ३ , घोगाव ३ तसेच अंकलखोप , भिलवडी , हजार वाडी , बांबवडे , माळवाडी , भिलवडी स्टेशन , ब्रम्हणाळ , संतगाव , व खंडोबाची वाडी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. असे १५ गावातील एकूण ७१ लोकांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.

Post a Comment

0 Comments