Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत जिल्ह्यात मृत्यूचे तांडव

सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आता मृत्यूचे देखील तांडव सुरु झाले आहे. आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात १० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. गेल्या आठ दिवसांत कोरोनामुळे सुमारे पन्नास नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनचे बेड मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात उच्चांकी ७६२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रशासनाने केलेल्या सर्व सुविधा अपुर्या पडत आहेत. रुग्ण वाढीबरोबर आता उपचारादरम्यान बळी जाणारांचा आकडा वाढत आहे. आज सर्वांत अधिक म्हणजे १० जणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. मृत्यू झालेल्या मध्ये खानापूर ३, कडेगाव २, मिरज २, पलूस १, आणि वाळवा तालुक्यात १ असे एकूण १० जणांना प्राण गमवावा लागला.

आज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ६०, जत २६, कडेगाव ५२ कवठेमंहकाळ ४१, खानापूर ८९, मिरज ६९, पलूस ३१, शिराळा ४९, तासगाव ८२, वाळवा ६५, तसेच सांगली शहर १६५ आणि मिरज शहर ६५ असा सांगली जिल्ह्यातील ७६२ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ४ हजार ८६९ रुग्ण उपचाराखाली आहेत.
-------------------------------
खानापूर तालुक्यात
आज ७३ पॉझिटीव्ह

विटा (प्रतिनिधी)
खानापूर तालुक्यात आज ७३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर विटा शहरातील एका तरुणासह तिघांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : विटा शहर २९, माहुली १, भिवघाट १, करंजे २, हिवरे ८, बलवडी खा. ४, मादळमुठी १, लेंगरे १, मंगरुळ चिंचणी १, कळंबी १, घानवड १, सुळेवाडी १, भाग्यनगर १, गार्डी ४, भिकवडी १, भेंडवडे १, कुर्ली २, वाझर १, आळसंद १, रामनगर १, अडसरवाडी १, खानापूर १,वेजेगाव १, भांबर्डे ३ आणि हिंगणगादे १ असे एकूण खानापूर तालुक्यात ७३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

खानापूर तालुक्यात
तिघांचा बळी ...

खानापूर तालुक्यात आज तिघांजणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सद्या तालुक्यातील सर्वच हाॅस्पीटल मधील जागा भरल्याने रुग्णांना अन्यत्र हलवावे लागत आहे. अवघ्या पाच सात दिवसात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भिती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments