Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ, १८ जणांचा बळी

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आता मृत्यूचे देखील तांडव सुरु झाले आहे. आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात १८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामध्ये खानापूर तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. 

सांगली जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. आज शुक्रवार ता. १६ रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील ८८३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सांगली जिल्ह्यात सद्या प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. सुमारे एक हजारच्या आसपास दररोज नवीन रुग्णांची वाढ होत आहे. नागरिक मात्र बेफिकीरीने रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे आगामी पाच सात दिवसातच आरोग्य व्यवस्था कोलमडून जाण्याची भिती व्यक्त होत आहे. नागरिकांनी आता स्वयंस्फुर्तीने लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 


आज सांगली जिल्ह्यातील १८ जणांना कोरोना मुळे प्राण गमवावा लागला आहे. तर ३७१ जणांनी आज कोरोना वर मात केली आहे. आज दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ५६, जत ७०, कडेगाव ६८ कवठेमंहकाळ ४६, खानापूर ७९, मिरज ७७, पलूस २३ , शिराळा ६९ , तासगाव ५१, वाळवा १३९, तसेच सांगली शहर १५६ आणि मिरज शहर ४९ असा सांगली जिल्ह्यातील ८८३ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या ६ हजार २५ रुग्ण उपचाराखाली आहेत. 
-------------------------------
वाळवा तालुक्यात १३९ पाॅझिटीव्ह 
वाळवा तालुक्यात आज १३९ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले तर २ जणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. तसेच खानापूर तालुक्यात देखील आज ७९ रुग्ण आढळून आले असून ३ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे.

Post a Comment

0 Comments