Daily Mahasatta

Daily Mahasatta

जत तालुक्यात १ लाख २९ हजारांचा गांजा जप्त

: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

जत (सोमनिंग कोळी)
जत तालुक्यातील शेगाव येथे शेतामध्ये छापा मारुन २१ किलो वजनाची सुमारे १ लाख २९ हजार रुपयाची गांजाची झांडे जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी दुपारी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्यातील शेगाव मध्ये तानाजी शिंदे याच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री सर्जेराव गायकवाड (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली), यांनी जत पोलीस ठाणे कडील प्रभारी अधिकारी यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांनी सुचना देण्यात आल्या.

त्याप्रमाणे जत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री पोलीस निरीक्षक उत्तम जाधव व पोलीस
उपनिरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस स्टाफ व पंचासह जत शेगाव गावी तानाजी शिदे रा. शिदे मळा याच्या शेतात छापा मारला. यावेळी त्याच्या शेतात २१ किलो वजनाची आणि सुमारे १ लाख २९ हजार रुपये किमतीची झाडे जप्त करण्यात आली. शेतमालक यांना ताबेत घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने
आपले नाव तानाजी जगन्नाथ शिदे वय -६२ रा गुळवंची रोड शिंदे मळा, शेगाव ता जत जि. सांगली असे
असल्याचे सागितले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री सर्जेराव गायकवाड याचे मार्गदर्शानाखाली पोलीस
निरीक्षक उत्त्तम जाधव, सपोनि कांबळे पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, पोहेकॉ/ जितु जाधव, राजु
शिरोळकर, राजु मुळे मच्छिद्र बड़े, पोना/ राहुल जाधव पोकॉ / अजय बेद्रे, चालक पोहेका / अरुण सोकटे यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments