Daily Mahasatta

Daily Mahasatta

दिल्लीच्या आरोग्य पथकाची शिराळा तालुक्यातील कोरोना सेंटरला भेटी


दिल्ली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची शिराळा येथील कोरोना सेंटरला भेटीप्रसंगी उपस्थित वैद्यकीय अधिकारी स्टाफ.

शिराळा (विनायक गायकवाड) : डॉ. प्रलयकुमार वर्मा सहसंचालक एन. सी. डी. सी. दिल्ली यांनी शिराळा तालुका दौरा केला. यामध्ये त्यांनी तालुक्यातील कोरोना केअर सेंटर पैकी आय. टी. आय., शिराळा उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्र अंत्री बु, निगडी उपकेंद्र येथे भेट दिली. कोरोना उपचार, प्रतिबंधक सेवा तसेच कोरोना लसीकरण विभागास भेट देऊन केलेल्या उपाय योजनेची माहिती घेऊन सदर कार्यवाही चांगली करत असून त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पाटील, डॉ. अनिरुध्द काकडे,डॉ. गणेश राजमाने, डॉ. विजय पवार, डॉ. मनोज महिंद्र, डॉ. योगिता माने, डॉ. संतोष पाटील, पोलीस पाटील वायदंडे, ग्रामसेवक पाटील आदी सह सर्व स्टाफ उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments