Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

ताकारीत संजय गांधी निराधार योजनेच्या पत्रांचे वाटप

वाळवा (रहिम पठाण)
ताकारी ता. वाळवा येथील संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गावातील 13 लाभार्थींना मंजूरीचे पत्र अध्यक्ष मा. संजय पाटील(बापू) यांच्या शुभहस्ते व राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष मा. विनायकराव पाटील(आण्णा )यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले गरजूंच्या पर्यंत शासन स्तरावरील योजना पोहचवण्याचा प्रयत्न मा. ना. जयंतराव पाटील (साहेब)यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. तालुक्यातील एकही लाभार्थी वंचीत ठेवला जाणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी पं. स. सदस्या सौ. रुपाली सपाटे, उप सरपंच श्री. रविंद्र पाटील, ग्रा. सदस्य प्रतिभा जाधव, शुभांगी सपाटे व लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments