Daily Mahasatta

Daily Mahasatta

आष्टा पोलीसांची धडक कारवाई, 50 वाहने जप्त

आष्टा (सचिन देसाई ) : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने राज्यात 15 दिवासासाठी संचारबंदी लागू केली आहे. तरी देखील आष्टा शहरात विना कारण फिरणार्यावर कारवाई करत पोलीसांनी पन्नासहून अधिक वाहने पोलीसांनी जप्त केली आहेत.

आष्टा शहर व परिसरात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील व विनाकारण फिरण्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन आष्टा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी केले. आष्टा शहर व परिसरात कडक नाकाबंदी करण्यात आली असून , आष्टा बस स्थानक परिसर , सांगली पेठ मार्ग , दुधगाव नाका, शिंदे चौक, रुकडे कमान, यासह विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यांत आली आहे. 

दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या तब्बल 50 हुन अधिक वाहन धारकांच्या वर कारवाई करण्यात आली व वाहने ताब्यात घेण्यात आली. या वाहनधारकांच्या वर आष्टा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित सिद , पोलीस निरीक्षक उदय देसाई, संदीप बांगडी, परशुराम ऐवळे , अभिजीत नायकवडी, महेश डांगे, व होमगार्ड यांनी कारवाई केली.

Post a Comment

0 Comments