Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीत लसीकरण सुरु, 5 हजार डोस प्राप्त

सांगली (प्रतिनिधी)
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकाक्षेत्रात कोरोना लसीकरण नियमतीपणे सुरू आहे. शासनाकडून महापालिकेला 5 हजार लसी प्राप्त झाल्या असून महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाक्षेत्रातील 29 केंद्रावर कोरोना लसीकरण नियमितपणे सुरू करण्यात आले आहे.

सांगली महापालिका क्षेत्रात एकूण महापालिकेची आणि शासकीय 16 रुग्णालय आणि 13 खासगी दवाखान्यात 45 वर्षावरील सर्वांसाठी कोरोना लसीकरण सुरू आहे. आजअखेर महापालिका क्षेत्रात 65 जनांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महापालिकेला शुक्रवारी उशिरा 5 हजार लसी प्राप्त झाल्यामुळे शनिवारपासून मनपाक्षेत्रात लसीकरण नियमतीपणे सुरू झाले आहे. महापालिकेच्या सर्वच दवाखान्यामध्ये लसीकरण करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच केंद्रावर सोशल डिटन्स पाळत आणि कोरोना नियमांचे पालन करत महापालिका क्षेत्रात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. अशी माहिती मनपा आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे यांनी दिली.

Post a comment

0 Comments