Daily Mahasatta

Daily Mahasatta

मसुचीवाडीत 45 वर्षी वरील सर्व नागरीकांचे लसीकरण पूर्ण : डाॕ. ज्योत्सना पाटील

वाळवा (प्रतिनिधी) : मसुचीवाडी ता. वाळवा येथील आरोग्य विभागा मार्फत गावामधील पंचेचाळीस वर्षी वरील सर्व नागरीकांना आज डोस देण्यात आले. नागरीकांनी स्वतः येऊन लसीकरण करुन घेतले,अशी माहिती डाॕ. ज्योत्सना पाटील यांनी दिली आहे. 

मसुचीवाडी ग्रामपंचायत मार्फत तुकाराम सावळा कदम विद्यामंदीर,मसुचीवाडी येथे लसीकरणांची सोय करण्यात आली होती. यावेळी मसुचीवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. राधिका पाटोळे,उपसरपंच शांताराम कदम ,ग्रामपंचायत सदस्य डाॕ. ज्योस्ना पाटील, डाॕ. चेतना साळुंखे, गाडगे मॕडम, सुनिल गावित, स्वयमसेविका सिमा गायकवाड, गिता शेलार, ज्योती आंबी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments