Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यातील रस्ते आणि पुलासाठी 27 कोटी : खासदार संजयकाका पाटील

भिलवडी (खंडेराव मोरे) : सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे रस्ते व विकास व पुलासाठी 26 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील रस्त्याच्या रुंदीकरणास सुधारणा करण्यासाठी तसेच पुलाच्या विकासासाठी 27 कोटी रुपये इतक्या भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते 

यामध्ये जत तालुक्यातील कर्नाटक हद्द जत निगडी येळवी लोणार जाडरबोबलाद सोन्याळ रस्त्याचे रुंदीकरण यासह सुधारणा करणे यासाठी चार कोटी 96 लाख, पलूस तालुक्यातील भिलवडी ते चोपडेवाडी या रस्त्यावरील सरळी ओढ्यावरील पूल बांधणे व रस्ता सुधारणा करणे यासाठी तीन कोटी 38 लाख, ब्रम्हनाळ ते सुखवाडी रस्त्यावरील सावकार वड्यावर पूल बांधणे दुरुस्त रस्ता सुधारणा करणे यासाठी एक कोटी 35 लाख तर तासगाव तालुक्यातील सावळज अंजनी गव्हाण मणेराजुरी कुमठे फाटा रस्त्याचे रुंदीकरणयासह सुधारणा करणे यासाठी तीन कोटी 92 लाख, खानापूर तालुक्यातील खरसुंडी बलवडी खूपारे आळते रस्त्याचे रुंदीकरण सुधारणा करणे यासाठी चार कोटी 95 लाख, मिरज तालुक्यातील बेळंकी ते तालुका हद्द रस्त्याचे रुंदीकरण सुधारणा करणे यासाठी तीन कोटी 96 लाख, मिरज तालुक्यातील डोंगरवाडी शिपुर व्यंकुचिवाडी रस्त्याची रुंदीकरणास सुधारणा करणे यासाठी तीन कोटी 96 लाख असे केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी सी आर आय एफ मधून एकूण रुपये 27 कोटी इतका निधी मंजूर केला आहे. सदर निधी मंजूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक परिवहन मंत्री नितिन गडकरी यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले 

यामुळे खासदार संजय काका पाटील यांचे सांगली जिल्ह्यातून स्वागत होत आहे. खासदार संजय काका पाटील हे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी आजपर्यंत जिल्ह्यसाठी केंद्रातून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. पुढील काळातही सांगली जिल्ह्यासाठी प्रयत्न करत राहणार असे संजय काका पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments