Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली मनपाचे कोविड सेंटर 24 एप्रिलपासून सुरू होणार : मनपाआयुक्त नितीन कापडणीस

सांगली (प्रतिनिधी)
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे 120 बेडचे कोविड हॉस्पिटल शनिवार 24 एप्रिलपासून सुरु होत आहे. मिरज शासकीय तंत्रनिकेतन येथे 
हे कोविड हॉस्पिटल सुरू होत आहे. अशी माहिती मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. आज आयुक्त कापडणीस यांनी मिरज तंत्रनिकेतन येथील कोविड हॉस्पिटलच्या तयारीचा आढावा घेतला. 

याबाबत बोलताना आयुक्त कापडणीस म्हणाले की, आदीसागर प्रमाणे कोविड रुग्णांसाठी सर्व मोफत सेवा असणारे कोव्हिडं हॉस्पिटल महापालिकेकडून सुरू केले जात आहे. 120 बेडचे हे हॉस्पिटल असून यामध्ये 24 तास रुग्णसेवा असणार आहे. याचबरोबर दाखल होणाऱ्या रुग्णांची कोविड संबंधित सर्व प्रकारची तपासणी महापालिके कडून केली जाणार आहे. याचबरोबर कोविड पॉझिटिव्ह म्हणून दाखल होणाऱ्या रुग्णांना सकाळच्या नाष्ट्यापासून ते जेवणापर्यंत तसेच औषधे महापालिका पुरवणार आहे. याचबरोबर रुग्णाला लागणारे अन्य साहित्यही महापालिका पुरवणार आहे. 

24 तास आरोग्यसेवा या ठिकाणी मिळणार असून यासाठी आवश्यक आरोग्य कर्मचारी नेमणूक 23 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. या कोरोना हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी हे 24 तास रुग्णांलयात कार्यरत राहणार आहेत. मिरज तंत्रनिकेतन येथे सर्व सुविधा असणारे कोव्हिडं हॉस्पिटल महापालिकेकडून शनिवार 24 एप्रिल पासून सुरू होत आहे . या हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे अशाच रुग्णाना दाखल करून घेतले जाणार आहे. तसेच ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही त्यांना शेजारील सीसीसीमध्ये पाठवले जाणार आहे असेही आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments