Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिका क्षेत्रात 209 कोरोना पॉझिटिव्ह

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी दिवसभरात 209 व्यक्तींचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर दिवसभरात 86 व्यक्ती होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहेत. मनपाक्षेत्रात 16 एप्रिल 2021 अखेर एकूण 1148 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 1043 व्यक्ती या होम आयसोलेशनमध्ये तर उर्वरित वेगवेगळ्या कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जनतेने काळजी घ्यावी आणि लक्षणे असणाऱ्यानी आपली कोविड तपासणी करून घ्यावी असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी दिवसभरात 209 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत तर यापैकी 86 जन होमयसोलेशनमध्ये आहेत. आजचे एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 1148 असून यापैकी 1043 व्यक्ती होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहेत. मनपाक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे जनतेने काळजी घ्यावी. कोणाला कोरोना सदृश्य लक्षणे असतील तर त्यांनी तातडीने आपली तपासणी करून घ्यावी. तसेच लक्षणे असणाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी करून योग्यवेळी आपले निदान करून उपचार घ्यावेत असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments