Daily Mahasatta

Daily Mahasatta

एन यु जे महाराष्ट्र -2021 पुरस्काराने तुकाराम बाबा महाराज सन्मानित

 एन यु जे महाराष्ट्र -2021 पुरस्काराने तुकाराम बाबा महाराज सन्मानित करताना मान्यवर.

जत (सोमनिंग कोळी)
चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत *नॅशनल युनियन ऑफ जनरारालिस्ट यांच्यावतीने 'एन यु जे महाराष्ट्र -2021' हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.

तुकाराम बाबा महाराज यांनी धार्मिक बमव सामाजिक कार्यात केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम बाबा महाराज हे कायम धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजजागृती करण्याबरोवरच जत पूर्व भागाला म्हैसाळचे पाणी मिळालेच पाहिजे या मागणीसाठी संख ते मुंबई मंत्रालय पायीदिंडी काढली.

जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातील पहिली खासगी चारा छावणी काढून पशुधन वाचवले. २५० हुन अधिक जणांना पाण्याच्या टाक्याचे वाटप केले. कोरोना काळात साडेसात हजार मास्क, साडेपाच हजार कुटूंबियांना जीवनावश्यक किट, 22 हजाराहून अधिक जणांना थेट घरोघरी लॉक डाऊन काळात भाजीपाला वाटप केला. गोंदिया येथे चालत निघालेल्या तरुणांना त्यांनी स्वखर्चाने त्यांच्या गावी पोहचवले. तालुक्यातील प्रतापूर, उटगी, येळदरी, खैराव , टोणेवाडी आदी गावात घर जळाल्याच्या घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात त्यांना मदतीचा हात देत रोख रक्कम व भांड्याचे वाटप केले.

त्यांच्या या कार्याची दखल घेत नॅशनल युनियन ऑफ जनरार्लिस्ट यांच्यावतीने 'एन यु जे महाराष्ट्र -2021' हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments